Chaphekar Bandhu Powada Lyrics – Amey Gawand

Chaphekar Bandhu Powada Lyrics – This is the latest Marathi song. The Song is sung by the popular singer Amey Gawand. The lyrics of the Chaphekar Bandhu Powada song are written by Amey Gawand.

Chaphekar Bandhu Powada Lyrics - Amey Gawand

Enjoy The Superhit Song ‘Chaphekar Bandhu Powada‘ Video Song and Lyrics

Song : Chaphekar Bandhu Powada
Singer : Amey Gawand
Lyrics : Amey Gawand
Music : –
Music On : Times Music Marathi

Chaphekar Bandhu Powada Song Lyrics

जयजयकार महाराष्ट्राचा…

जयजयकार महाराष्ट्राचा, देशभक्तांचा, क्रांतिवीरांचा.
शूर वीरांच गातो गुणगान × 2
ऐका पोवाडा देऊन कान जी र हा जी जी ×2

क्रांतीची ऐका ही गाथा…
क्रांतीची ऐका ही गाथा, नमवुया माथा शुरांच्या चरणी
मायभूमीची राखली शान ×2
आसावा त्यांचा हो अभिमान जी र हा जी जी ×4

साल – 1897. देशावर इंग्रजांच, परकीयांच राज्य आहे.
अशातच, प्लेग नावाच्या एका महाभयंकर रोगाची साथ
महाराष्ट्रात आली आहे.
पुण्यात आॕफिसर रँड आणि त्याच्या सहकार्यांनी तर अत्याचाराची परीसीमा गाठली आहे.
तीन भावांनी ठरवल,
” या अत्याचाराला उत्तर हे दिलच पाहिजे !”
आणि अशात उजाडला मंगळवार 22 जून 1987!
व्हिक्टोरीया राणीचा 60 वा वाढदिवस , ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला 60वा राज्य उत्सव !
अहो मेजवानी होती! मेजवानी होती गव्हर्नरच्या बंगल्यावरती!
आपल्या गोरगरीब जनतेला लुटून , इंग्रज मस्तीत, मजेत जगत होते, मेजवान्यांवर मेजवान्या देत होते!

फटाक्यांचे आवाज घुमती
चहुबाजूंनी जी र ह जी जी ×3

घडाळ्यात वाजले बारा
अंधार पसरला सारा
घडाळ्यात वाजले बारा
चोहिकडे अंधार सारा

साहेब बाहेर आले
दारूत पूर्ण झिंगलेले
पाठलाग सुरू मग केला

या तीन भावांनी बग्ग्यांचा पाठलाग सुरू केलेला आहे….
दामोदर, वासुदेव आणि बाळकृष्ण…
हेच ते तीन भाऊ! चाफेकर बंधू बरं का….

पाठलाग सुरू मग केला
“गोंद्या आला रे आला…!”
इशार्याचा शब्द मग केला…
बाळकृष्ण गाडीवर चढला…
धडाधडा बार काढला, साहेब मारला जी र ह जी जी ×3

अरे! भलताच साहेब मेला, मागून शब्द पुन्हा आला..
भलताच साहेब मेला..
चुकून मारला होता आयर्स्टनला…

दामोदरने वेग घेतलेला…
“गोंद्या आला रे आला!”
तातडीने धरलं गाडीला
साहेबाच्य मागे तो आता उभा राहिला
डोक्यावर ठेवून पिस्तूलाला..
झटक्यात ट्रिगर दाबला… !

धडाधडा सहा बार काढले त्याने त्या वेळेला जी जी जी
साहेब मारला जी र ह जी जी ×4

आणि अशाप्रकारे, चाफेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्टन या दोन जुलमी इंग्रजी अधिकार्यांचा गोळ्या घालून वध केला…!

Also Read : Continue reading at

Jatta Tenu Saunh – Amrit singh
Video Bana De – Sukh-E Muzical Doctorz

Lyrics of all Latest Marathi Album Songs

Leave a Comment

close