Gudi Padwa Wishes in Marathi | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa Wishes In Marathi 2025 – हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला पहिला दिवस, म्हणजेच गुढीपाडव्याच्या सणापासून होते. या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. नवीन वर्षाची सुरुवात यशाने व्हावी, यशाची गुढी उंचच राहावी, अशी इच्छा या दिवशी व्यक्त केली जाते. चैत्रात आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतो. अंगणात मोगर्‍याचा सुगंध दरवळायला लागतो, वसंताच्या आगमनाची ही चाहूल असते. असा हा गुढीपाडवा निसर्गासोबतच सगळ्यांच्या जीवनात वसंत फुलवतो. या दिवशी एकमेकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
तर चला तर मग, गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Gudi Padwa Wishes in Marathi 2025 –

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या,
कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी..
गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा…!

सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा..
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

close