Happy Womens Day Wishes in Marathi | जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Happy Womens Day Wishes In Marathi 2025 – दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाला समर्पित आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता.
तर चला तर मग, जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Happy Womens Day Wishes in Marathi 2025 –

“आईच्या वात्सल्याला प्रणाम
बहिणीच्या प्रेमाला प्रणाम
मैत्रिणीच्या विश्वासाला प्रणाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला प्रणाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला प्रणाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे,
ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…”

“तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…

“स्त्री म्हणजे वास्तव्य,
स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व,
स्त्री म्हणजे कतृत्व,
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…”

“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणू तू
जगत जननी तू
मावळ्यांचा भवानी तू
प्रयत्नांनाा लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…”

“ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे”
महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा…”

close