Mala He Dattaguru Disale Song Lyrics from movie Amhi Jato Amuchya Gava Mala He Dattaguru Disale song is sung by Asha Bhosle. It has music composed by Sudhir Phadke and while lyrics are penned by Jagdish Khebudkar.
Enjoy The Superhit Song ‘Mala He Dattaguru Disale‘ Video Song and Lyrics
Movie : Amhi Jato Amuchya Gava
Song : Mala He Dattaguru Disale
Singers : Asha Bhosle
Musics : Sudhir Phadke
Lyrics : Jagdish Khebudkar
Stars : –
Director : –
Music Label : Saregama India Limited
Release Date : 1972
Mala He Dattaguru Disale Song Lyrics
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…
माय उभी ही गाय होऊनि
पुढे वासरू पाहे वळुनी
माय उभी ही गाय होऊनि
पुढे वासरू पाहे वळुनी…
कृतज्ञतेचे, श्वान बिचारे
पायावर झुकले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…
चरण शुभंकर, फिरता तुमचे,
चरण शुभंकर, फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
मंदिर बनले उभ्या घराचे…
घुमटामधुनी, हृदयपाखरू स्वानंदे फिरले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…
तुम्हीच केली, सारी किमया,
कृतार्थ झाली माझी काया
तुम्हीच केली, सारी किमया,
कृतार्थ झाली माझी काया…
तुमच्या हाती, माझ्या भवती
औदुंबर वसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले
मला हे दत्तगुरू दिसले…