Marathi Bhasha Din Wishes In Marathi 2025 – ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, 27 फेब्रुवारी रोजी कविवर्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगादानामुळे महाराष्ट्र शासानाने २१ जानेवारी २०१३ मध्ये या २७ फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला ‘मराठी भाषा गौरव दिन‘ म्हणून घोषित केले. आपल्याला आपल्या मातृभाषेचा आदर आहेच.
तर चला तर मग, मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Marathi Bhasha Din Wishes in Marathi 2025 –
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!