Ramzan Eid Wishes In Marathi 2025 – “ईद मुबारक” रमजान हा चिंतन, प्रार्थनेसाठी मुस्लिम समुदायासाठी एक पवित्र काळ आहे. चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होईल. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्या नंतर एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा आणि ईदी देतात. मुस्लिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. ईद निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. दूध, सुकामेवा आणि शेवया या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते.
तर चला तर मग, रमजान ईदनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रमजान ईदच्या शुभेच्छा देऊ शकतात.
Ramzan Eid Wishes in Marathi 2025 –
“चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा
ईद निमित्त मागूया खुदाला ईच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा…”
“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो,
सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा…!”
“बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच करून मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक…!”
“यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा…”
“अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत…!”
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक…!”