Sant Gadge Baba Jayanti Wishes in Marathi | संत गाडगे बाबा जयंतीच्या शुभेच्छा

Sant Gadge Baba Jayanti Wishes In Marathi 2025 – संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील सुर्जी तालुक्यातील शेंडगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला होता. संत गाडगे महाराज कमावलेल्या पैशातून गावात शाळा, धर्मशाळा, रुग्णालये आणि जनावरांसाठी घरे बांधत असत. संत गाडगेजी महाराजांनी लोकांना धार्मिक कारणांसाठी प्राण्यांचा बळी देण्याची जुनी प्रथा बंद करण्याची शिकवण दिली आणि दारूच्या वापराविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली.
तर चला तर मग, संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास संत गाडगे बाबा जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Sant Gadge Baba Jayanti Wishes in Marathi 2025 –

महान संत, कर्मयोगी, क्रांतिकारी विचारक
समाज सुधारक, स्वच्छता अभियानाचे जनक
संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…

झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे
संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

भुकेलेल्यांना अन्न – तहानलेल्यांना पाणी उघड्यानागड्यांना-वस्त्र,
गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत,
बेघरांना आसरा – अंध, अपंग रोगी यांना औषधोपचार,
बेकारांना रोजगार – पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय,
गरीब तरुण-तरुणींचे लग्न – दुःखी व निराशांना-हिंमत हाच खरा धर्म. !
संत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली…

स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्यास गती अज्ञान,
अंधश्रध्दा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे
संत गाडगे महाराज यांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन …!

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ,
अपंगांची सेवा करणारे थोर संत
गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन…

close